आणिला
मागुती नेला, आला गेला मनोगती।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।
मनासी टाकिलें मागें, गतीसी तूळणा नसे ।।१०।।
हनुमत चरित्रात त्याचे पुच्छ हा
जसा कौतुकाचा विषय आहे तसेच त्याचे उड्डाण देखील समर्थांच्या कौतुकाचा विषय आहे. हनुमंताला
तरुणपणी ऋषींच्या शापामुळे स्वसामर्थ्याचे विस्मरण जाले होते. परंतु जाम्बुवंताने
जेव्हा त्याची अस्मिता जागी केली तेव्हा त्याला आपल्या सामर्थ्याची जाणिव झाली.
गरुडापेक्षाही हनुमंताची गती जास्त आहे नव्हे त्याही पेक्षा चपळ अशा मनापेक्षाही
हनुमंताची गती अधिक आहे.
हनुमंतांनी अत्यंत वेगाने जाऊन
द्रोणागिरी पर्वत उचलून लंकेत आणला होता. अत्यंत चपळाईने त्याने हे काम पूर्ण केले
आहे. इतक्या मोठ्या पर्वतासह उड्डाण ही सहज गोष्ट नव्हे. स्व:ताच्या वजनाबरोबर
पर्वताचे वजन त्यांनी उचलून आणले होते. यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येते. हे
सर्व काम नियोजित वेळेत त्यांनी केले. यावरून हनुमंताच्या उड्डाणाच्या गतीची
आपल्याला कल्पना येते. त्यांच्या उड्डाणाची गती मनाला देखील मागे टाकणारी आहे.
मनाचा वेग प्रचंड आहे. आणि हनुमंताचा वेग त्याच्याहीपेक्षा आधिक आहे. परब्रम्हाचे
व्यापकत्व स्पष्ट करताना आकाशाची उपमा दिली जाते. त्याप्रमाणे हनुमंताच्या गतीला त्यातल्या
त्यात चपळ म्हणून मनाची उपमा दिली जाते. हनुमंत नेटके आहेत. तसेच त्यांचे वागणे
देखील नेटके आहे. म्हणूनच पर्वत ज्या जागेवरून आणला त्याच जागेवर त्यांनी तो
पुन्हा नेऊन ठेवला. काम झाल्यावर वस्तू जागेवर ठेवण्याची हनुमंताना सवय दिसते. J
No comments:
Post a Comment