पुच्छ
तें मुरडिलें माथां, किरीटी कुंडलें बरीं ।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ।।७।।
हनुमंताच्या रूपाचे वर्णन समर्थ याठिकाणी करत आहेत.
हनुमंताच्या शेपटीचे सामर्थ्य रामायणामध्ये पाहायला मिळते. वज्रासारखा प्रहार
करणारी शेपटी याठिकाणी हनुमंतांनी वळवून ठेवलेली आहे. हनुमंताच्या मस्तकावर सुंदर
मुगुट आणि कानात सुंदर कुंडले शोभून दिसत आहेत. मंजुळ आवाज करणारे घंगरू लावलेली
साखळी हनुमंताच्या कमरेला शोभून दिसत आहे. पायात रूणझुणणारे नूपुर असून दोन्ही
हातात कंकणे आहेत. हनुमंताच्या कटीप्रदेशावर सुवर्ण कौपिन झळकत आहे..
याठिकाणी हनुमंताची शेपटी योग्य ठिकाणी आहे म्हणजे ते शांत
आहेत. समुद्रा वरून उडत जात असताना हनुमंतानी आपली शेपटी इंद्राच्या ध्वजाप्रमाणे
उभारली होती. हनुमंताची शेपटी त्याचे बलस्थान आहे. त्यची शेपटी हे त्याच्या
पराक्रमांचे विशेष साधन आहे. समुद्रोल्ल्घन, लंकादहन, तसेच पर्वतागमन अशा अनेक
कामामध्ये हनुमंताला त्याच्या शेपटीचा उपयोग झाला आहे. सत्रुला नामोहरम करण्यासाठी
त्याने आपल्या बळकट शेपटीचा सर्वात जास्त उपयोग करून घेतला आहे. वाल्मिकी रामायण
तसेच इतर रामायणामधून हनुमंताच्या शेपटीचे वर्णन करताना त्याच्या शेपटीला ‘महाकालाची
लांब जीभ’, ‘आकाशातील शेषनाग’, ‘यमराजाने पसरलेला कालपाश’ अशा निरनिराळ्या उपमा
दिल्या गेल्या आहेत. त्याची शेपटी हे पराक्रमाचे प्रतिक आहे...
किती प्रताप वर्णू याचा |
श्रीसमर्थ मारुतीचा |
शौर्य दाक्ष्यं बलं धरी धैर्य
प्राज्ञता नयसाधनम ( वा. रा. ७. ३५. ३. ५ ) अशी प्रभुरामचंद्रांनी ज्याची प्रशंसा
केली असा हनुमंत एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्याच्या अंगी असणाऱ्या सर्व
गुणाचा प्रत्यय आपल्याला वाल्मिकी रामायणात येतो. अत्यंत बलसंपन्न अशा या हनुमंताचा
अतुलनीय पराक्रम याठिकाणी पहावयास मिळतो. सेतू बांधून सर्व वानरसेना घेऊन प्रभू
संकेत आल्यावर घनघोर युद्ध झाले. या युद्धात हनुमंताने अलौकिक कामगिरी केली. राम
रावण युद्धात हनुमंताने अनेक राक्षसांचा संहार केला होता. या युद्धात त्याने
आपल्या वज्रदेहाचा उपयोग केला. तीक्ष्ण नखे, दात यांचा वापर्त्याने केला. पर्वत, मोठे
वृक्ष, मोठ्या शिला यासर्वाचा त्याने आयुध म्हणून उपयोग केला. राम रावण
युद्धात रावणाच्या रथावर हनुमंताने
मोठमोठे वृक्ष पर्वत आणि दगडांचा वर्षाव केला. अकंपनाचा वध वृक्षाच्या प्रहाराने,
धूम्राक्षराशी युद्ध करताना पर्वत शिखरांचा वापर करून त्याचा वध केला. रावण
कुंभकर्ण आणि मेघनाद या बलाढ्य राक्षसांना हनुमंताने आपल्या मुष्टीप्रहाराने
बेशुद्ध केले होते. त्याने आपल्या शेपटी व्यतिरिक्त गदा, तोमर, वज्र, परीघ, मुद्गर,या
शस्त्राचा देखील उपयोग केला होता. परंतु हनुमंताने प्रत्यक्षात शस्त्राचा वापर कमी
करून स्वबलाचाच जास्त वापर करून उत्ताम यश मिळवले होते...
हनुमंताची सुवर्ण कौपिन स्वयंभू
आहे. “स्वयंभू सोन्याची कासोटी | ” ही सोन्याची कासोटी हनुमंत आईच्या गर्भात
असल्यापासून आहे. पण ती केवळ अंजनी माता आणि प्रभू रामचंद्रच पाहू शकतात. भावार्थ
रामायणानुसार
“ हनुमंतासी गर्भ कासोटी |
अंजनी माता देखे दृष्टी |कि राम जगजेठी देखेल |” हनुमंताना मातेने सांगितले होते कि ही
सुवर्ण कौपिन ज्यांना दिसेल तेच तुझे प्रभू. रामविजय मध्ये हनुमंताला पाहताच
श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले होते,
“ झळकता हे हेमकौपिन वज्रबंधन न
चले मदन |
माजे चित्त स्नेहे करून यासी
देखोन भरले असे |”
हे सुवर्ण कौपिन पाहू शकणाऱ्या
तीनच व्यक्ती आहेत त्याम्हणजे अंजनी माता, प्रभू रामचंद्र आणि हनुमंत स्वत: (
संदर्भ: श्री भीमरूपी स्तोत्र प्रसाद )
असे हे हनुमंताचे मोहक रूप आहे.
अत्यंत भव्य, आक्रमक होतात तेव्हाचे रोद्र रूप पाहून काळाला देखील धडकी भरते आणि
भक्त मारुतीचे दर्शन घडले तर भक्ताच्या मनात दिलासा आणि विश्वास निर्माण करणारे
असे हे हनुमंत समर्थांना विशेष प्रिय आहेत.....क्रमशः
No comments:
Post a Comment