Thursday, May 2, 2019

नमस्कार

         नुकतेच माझे " चिरंजीवी " हे तिसरे पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक हनुमान चरित्र आणि उपासना याविषयीचे आहे. या ब्लॉगवर तुम्ही "भीमरूपी स्तोत्र" यावरील विवेचन वाचत आहात. या पुस्तकामध्ये मारुतीरायावर अधिक व्यापक विचार केला गेला आहे. समर्थांनी नेमकी उपासना कशी असावी हे दासबोधात स्पष्ट केले आहे. ते सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केला आहे. हनुमान चरित्र, समर्थांची हनुमान भक्ती, समर्थ रचीत ११ मारुती स्तोत्राचे थोडक्यात विवेचन, समर्थ स्थापित ११ मारुतीची भौगोलिक माहिती, समर्थ लिखित रामायणाचा परिचय, भीमरूपी स्तोत्र याचा विस्ताराने अर्थ सांगण्याचा प्रयत्न आणि समर्थांची उपासना या विषयीचे विवेचन यामध्ये आले आहे. या पुस्तकाला आचार्य किशोरजी व्यास म्हणजेच स्वामी गोविंददेव गिरि यांचे आशीर्वाद लाभले आहेत आणि डॉ.कल्याणी नामजोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाची किंमत फक्त २२५ असून सवलतीत फक्त २००र‍‍‌‍ मध्ये उपलब्ध आहे. संपर्क : madhavismahajan17@gmail.com / ९८८१४७७०८०याशिवाय समर्थ चरित्र सुगंध (समर्थांच्या आधुनिक चरित्रांचा अभ्यास या माझ्या प्रबंधावर आधारित ) , 
आणि स्मरण समर्थांचे (डॉ समीता टिल्लू आणि डॉ माधवी महाजन यांचे समर्थ चरित्र, वाड्मय आणि समर्थांवरील विविध लेखांवर आधारित ) ही दोन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. 
 

आगामी प्रकाशन 

समर्थ वाड्मयाचा परामर्श 

९ फेब्रुवारी २०२३