ध्वजांगे
उचली बाहू, आवेशें
लोटिला पुढें ।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ।।५।।
या श्लोकात मारुतीच्या पराक्रमी
गतिमानतेचे वर्णन आले आहे. अन्यायाविरुद्ध उभा ठाकलेला हनुमंताचे रूप शत्रूसाठी
भयावह तर भक्तासाठी दिलासा देणारे आहे. हातामध्ये गदा किंवा ध्वज घेऊन सामोरा
जाणारा, पुढे जाणाऱ्या हनुमंताचा आवेश मृत्युला देखील भीतीदायक वाटत आहे. आत्ता
पर्यत निरनिराळ्या विशेषणांद्वारे समर्थांनी मारुतीचे गुणवर्णन केले आहे. असा हा
सर्वगुणसंपन्न हनुमंत जेव्हा अन्याय विरुद्ध लढा द्यावयास सज्ज होतो तेव्हा त्याचा
आवेश कसा असतो याचे वर्णन या श्लोकात आले आहे. ध्वज हे विजयाचे प्रतिक आहे. हा
ध्वज पाहून सैन्याचे बळ वाढत असते. हनुमंतांनी ध्वज बांधलेला दंड आपल्या विशाल
बाहूमध्ये धारण करून आकाशात उंचावला आहे. धर्मस्थापनेसाठी जेव्हा हनुमंत आवेशपूर्ण
अवतार घेतात तेव्हा त्यांचे रूप अत्यंत विशाल, भयंकर, आणि वेगवान असते.
अद्भूर वेष आवेशे | कोपला रण
कर्कशु |
धर्मस्थापनेसाठी | दास तो उठिला
बळे ||
शत्रूच्या नाशासाठी, अत्यंत
क्रोधित आवेशपूर्ण असे हनुमंताचे रूप प्रलयंकारी काळाप्रमाणेच भासत आहे. हनुमंताचा
पराक्रम बघताना त्याचे हे रूप अनेक ठिकाणी पहावयास मिळते.....
समर्थांनी एकूण १३ मारुती
स्तोत्रे लिहिली यापैकी “कोपला रुद्र जे काळी ते काळी पहावेची ना | या स्तोत्रात
धर्मस्थापनेसाठी क्रोधाविष्ट होऊन उठलेल्या मारुतीचे आवेशपूर्ण वर्णन आले आहे.
भगवती सीतेला लंकेत जाऊन भेटल्यानंतर मारुतीने लंकादहनाचे जे कार्य केले तसेच युधकालामध्ये
त्याने जे रुद्ररूप धारण केले या सर्वाचे वर्णन यामध्ये समर्थांनी केले आहे. भगवती
सीता हे धर्माचे प्रतिक आणि या धर्मस्थापनेसाठी मारुतीरायाने रुद्रावतार धारण करून
महाप्रलय घडवला.
हनुमंत साक्षात काळाग्नी काळरुद्राग्नी आहेत. प्रलयनिरुपणात समर्थ त्यांचा उल्लेख प्रलय पावकअसे
करतात. भक्ताच्या मनात दिलासा निर्माण करणारे तर शत्रूच्या मनात धडकी भरणारे असे हनुमंताचे
स्वरूप आहे. ज्यांना आपल्या प्रभूंप्रमाणेच अन्याय सहन होत नाही. अन्याय विरुद्ध भयावह रुपात
उभा ठाकलेला हनुमंत याचे वर्णन समर्थ यापुढील श्लोकात करतात.... क्रमशः
No comments:
Post a Comment