https://www.youtube.com/@ShriSamarthVaani
समर्थ रामदास स्वामींचे षड्रिपू निरुपण प्रकरण 🙏
षड्रिपू हे गुण असतील तेव्हा त्यातून सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील आणि जर त्याचे विकारात रूपांतर झाले तर मात्र नकारात्मक परिणाम भोगावे लागतात. या प्रत्येक रिपूंविषयी समर्थांनी या प्रकरणात सविस्तर विचार केला आहे. त्याचे होणारे दुष्परिणाम यामध्ये पहायला मिळतात. तसेच या विकारांच्या आधीन गेल्यावर माणसाचे वर्तन कसे असते याचे पण दर्शन घडते.
संसार म्हटलं की दुःख आहेतच आणि त्याला महत्वाचे कारण म्हणजे हे षड्रिपू. मन एकाग्र होण्यासाठी मोठा अडसर असणारे हे षड्रिपू. या प्रत्येक रिपूंविषयी समर्थांनी एकूण ९६ओव्यांमध्ये सविस्तर विचार केला आहे. त्याचे होणारे दुष्परिणाम यामध्ये पहाला मिळतात. या विकारांच्या आधीन गेल्यावर माणसाचे वर्तन कसे अधोगतीला नेणारे असते याचे समर्थांनी नेमके कसे वर्णन केले आहे जाणून घेण्यासाठी श्री समर्थ वाणी नक्की ऐका
आवडले तर लाइक करा सबस्क्राइब करा आणि इतरत्र शेअर करा