Wednesday, June 2, 2010

जय जय रघुवीर समर्थ

8 comments:

  1. अतिशय सध्या सोप्प्या सरळ शब्दात समर्थांच जीवन उलगडून दाखवल आहे.. खूप मस्त आवडल. अजून हि त्यांच्याबद्दल वाचयला आवडेल. पुढच्या पोस्ट् ची वाट बघत आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विनीत :)समर्थाचे मनाचे श्लोक आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याच विषयी पुढील लेख लिहण्याचा प्रयत्न असेल.
      || जय जय रघुवीर समर्थ ||

      Delete
  2. माधवीजी, तुमचा लेख वाचला. पहिली गोष्ट म्हणजे "मनाचे श्लोक" आपल्या आपल्या मनामध्ये अगदी लहान असतानाच कोरले गेलेले आहेत. शाळेत असताना दर शनिवारी प्रार्थना झाल्यावर मनाचे श्लोक आवर्जून म्हटले जात असत. त्याच वेळी शाळेच्या पाठ्यपुस्तकात असलेला श्री रामदास स्वामींचा धडा ही कधीही न विसरणारी गोष्ट आहे. पुढे इतिहासात सुद्धा शिवरायांच्या काळातील रामदास स्वामी समर्थांचे योगदान सगळ्यांनाच माहित आहे.

    अर्थातच हा इतिहास खूपच त्रोटक माहित होता. नंतरच्या काळात रामदास स्वामींच्याबद्दल अनेक गोष्टी वाचनात आल्या. तरीही तुम्ही तुमच्या लेखात दिलेल्या अनेक गोष्टी अतिशय मुद्देसूद आहेत. तुम्ही दिलेली माहितीही खूपच चांगली आहे.

    हा लेख वाचल्यावर जाणवणारी अजून एक गोष्ट म्हणजे रामदास स्वामींनी केलेल्या क्रांतीचा पुन्हा एकदा अनेकांना विसर पडलेला आहे किंवा अनेकजण त्या गोष्टी सोयीस्करपणे विसरलेले आहेत. सध्याच्या काळात समाजातील अशा लोकांना रामदास स्वामींच्या क्रांतीची आठवण करून देणे खरंच अतिशय आवश्यक झालेले आहे. सध्या जो-तो स्वतः मध्ये गुरफटून गेला आहे. कोणालाच समाजाबद्दल विचार करण्याची इच्छा नाही किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांना अनेक कारणांनी याबाबत विचार करणे किंवा मांडणे शक्य होत नाही.

    हे कितीही खरे असले तरी आज आपल्या समाजाला जागृत करणेही तितकेच आवश्यक आहे यात शंकाच नाही. तसंच, 'हे काम आपले नाही', 'इतर कोणीतरी करेल' असा विचार करणे अत्यंत चुकीचे आहे. आपण समर्थांच्या जीवनावर टाकलेल्या प्रकाशाने प्रेरित होऊन प्रत्येकाने स्वतःचे काम जरी चोख केले तरी आपल्या जीवनांत खूप फरक पडेल यात शंका नाही.

    पुन्हा एकदा आपल्या उत्तम लेखाबद्दल आणि आपण श्री रामदास स्वामींच्या जीवन कार्यावर टाकलेल्या प्रकाशाबद्दल तुमचे अभिनंदन. तुमच्या पुढच्या लेखाबद्दल नक्कीच उत्सुकता ताणली गेलेली आहे. तुम्ही लवकरच तो सादर कराल याची खात्री आहे. ... धन्यवाद. ।। जय जय रघुवीर समर्थ ।।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद विनीतजी
      समर्थांनी त्याकाळात समाजात जागृती निर्माण करण्यासाठी आपले प्रखर विचार समाजात निर्भयपणे मांडले जे आजही आपल्याला मार्गदर्शक ठरतायत. तसा पहिला तर त्यावेळची सामाजिक परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यामध्ये काहीच फरक वाटत नाही. खूप सुधारणा जरी झाल्या तरी २१ व्या शतकातील माणसांच्या वृत्तीमध्ये काहीच बदल झालेला दिसत नाही. हेवेदावे,राग, द्वेष, मत्सर, या क्षुद्र वृत्ती आणि त्यातून निर्माण होणारा हिंसाचार. कुठेतरी बदले पाहिजे. आणि यातून समर्थांचे समर्थ विचारच तारू शकतात हा विश्वास आहे. वृत्तीत बदल करणारे हे विचार या निमित्ताने पुन्हा पुन्हा वाचण्याचा व चिंतन मनन करण्याचा या निमित्ताने एक प्रयत्न .

      जय जय रघुवीर समर्थ

      Delete
  3. लेख सुंदर आहे... धन्यवाद !
    समर्थांच्या चरित्रांचा कालानुरुप आढावा घेता येईल का ? जसे की , पहिली १२ वर्षे टाकळीची , नंतरची १२ वर्षे पुरश्चरणाची , नंतरची १२ वर्षे तीर्थाटनाची,आणि त्यानंतरची ३६ वर्षे लोककारणाची.. असे ४ वेगेवेगळे ट्प्पे घेऊन श्री समर्थांचे अलौकिकत्व दाखवता येईल का ?
    तसेच त्यांच्या लेखनाचा काळ ठरवता येईल का ?

    ReplyDelete
  4. JAI JAI RAGHUVEER SAMARTHA!!!!!!

    ReplyDelete
  5. सर्वांना मनापासून धन्यवाद
    सुहास तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या चार टप्प्यात समर्थचरित्र वर्णन करता येऊ शकते. समर्थांवर खूप चरित्र लेखन झाले आहे. त्यामध्ये ब-यापैकी या सर्वाचा आढावा घेण्यात आला आहे.

    ReplyDelete
  6. !!श्रीराम समर्थ !!

    ReplyDelete